लिमा, (पेरू) – पेरूच्या हंगामी अध्यक्षांनी राजीनामा देण्यासाठी सुरू झालेले आंदोलन अधिकच तीव्र झाले आहे. रविवारी रात्री झालेल्या आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसाचारामध्ये दोन लोक ठार झाले आणि देशातील बिघडलेले राजकीय वातावरण आणखी बिघडले.
हंगामी अध्यक्ष मॅन्युएल मेरिनोच्या मंत्रिमंडळातील किमान 9 सदस्यांनी राजीनामा दिला आहे आणि संसदेच्या अध्यक्षांनी या मंत्र्यांच्या राजीनाम्यावर चर्चा करण्यासाठी आपत्कालीन अधिवेशन बोलावले आहे.
हजारो लोक मास्क घालून आणि “मेरीनो माझे अध्यक्ष नाहीत’ असे बॅनर घेऊन लिमाच्या रस्त्यांवर उतरले आणि त्यांच्या निदर्शनांना हिंसक स्वरुप प्राप्त झाले. या निदर्शनांदरम्यान झालेल्या गोळीबारात दोघेजण मारले गेले, असे सरकारी यंत्रणांनी सांगितले.
विधानसभेने माजी अध्यक्ष मार्टिन व्हिजकारे यांना हद्दपार करण्यासाठी संसदेमध्ये मतदान करण्यात आले. त्यानंतर अल्पकाळापूर्वीच राजकारणात आलेले आणि तांदूळ उत्पादक मेरिनो सोमवारी पेरूच्या सर्वोच्च पदावर दाखल झाले.