लिमा, (पेरू) – पेरूचे हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून फ्रान्सिस्को सगस्ती यंनी पदभार स्वीकारला. मार्टीन व्हीझकॅरा यांनी 9 नोव्हेंबरला राजीनामा दिला होता.
सरकार विरोधात मोठा जनक्षोभ उसळल्यानंतर झालेल्या हिंसाचारात दोन जण मरण पावले होते. तर 100 जण जखमी झाले होते. त्यानंतर 15 नोव्हेंबरला सरकारने राजीनामा दिला होता.
मी देशाच्या वतीने या हिंसारात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांची आणि लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलनात उतरणाऱ्या सर्वांची माफी मागतो, असे अधिकृत समारंभात सगसस्ती म्हणाले.
या आंदोलनानंतर बेपत्ता झालेल्या सर्वाना शोधण्याचा प्रशासन पूर्णत: प्रयत्न करेल, असे मी आश्वस्त करतो. याबरोबरच आपल्याला करोनाशी लढायचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.