अमरावती – मिशन बिगिन अगेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये शिथितला देण्यात आल्यानं विविध सेवा पूर्ववत होत आहेत. जिल्ह्यात मर्यादित सेवांसह केश कर्तनालये, सलून, ब्युटी पार्लर पुन्हा सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून अमरावती जिल्ह्यात अटीशर्तीसह सलून ब्युटीपार्लर दुकानं सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे.
यामध्ये केस कापणे, केसाला रंग देणे, वॅक्सिंग, थ्रेडिंग केवळ याला परवानगी असेल. त्वचे संबंधित सेवांना परवानगी नाही. कर्मचाऱ्यांनी हातमोजे, ऍप्रन, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा. खुर्ची आणि जमिनीचा पृष्ठभाग वेळोवेळी निर्जंतूक करावे. विल्हेवाट लावता येतील असे टॉवेल आणि नॅपकीन वापरावे. तसेच, दुकानातील जमीनीच्या पृष्ठभागाचे दर दोन तासांनी निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.
त्यामुळे आता तीन महिन्यांपासून सलून व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता आता त्यात काहीसा दिलासा मिळणार आहे.