माजी ब्युटी क्वीन आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला “ऐस्लाडोस’ सिरिजद्वारे आंतरराष्ट्रीय करियरची सुरुवात केली आहे. ही सिरिज नुकतीच प्रदर्शित करण्यात आली आहे. या सिरिजमधून ती केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण आशियाचे प्रतिनिधित्व करणे तिच्यासाठी मोठा सन्मान असल्याचे तिचे मत आहे.
उर्वशी म्हणाली, मी केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण आशियाचे प्रतिनिधित्व करीत आहे. याबद्दल मला खरोखर कृतज्ञता आणि धन्यता वाटते. आशियाचे प्रतिनिधित्व करणारी मी एकमेव कलाकार असल्याने माझ्यासाठी हा मोठा सन्मान आहे.
अभिनेत्री उर्वशी म्हणाली, “या लघुपटात जगभरातील आरोग्याच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यात सुमारे 30 देशांमधील प्रवास दाखविण्यात आला आहे. हा माहितीपट चार भागांमध्ये सिरिजच्या माध्यमातून उपलब्ध आहे.
“एस्लाडोस’ हा स्पॅनिश-इंग्रजीमध्ये बनविलेला एक लघुपट आहे, ज्यात आरोग्याचे संकट दाखविण्यात आले आहे. याचे दिग्दर्शन लुसिटो कोमुनिका आणि जुआन्पा जुरिता यांनी केले आहे. हा लघुपट 30 देशांमध्ये स्पॅनिश व इंग्रजी भाषेत यूट्यूबवर रिलीज करण्यात आला आहे.