fbpx

“मटार कचोरी’ विथ लो कॅलरिज…

पुणे – नुकतंच हिवाळा सुरू झाला आहे. या हंगामाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला ताजे आणि फ्रेश पदार्थ घायला मिळतात. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे ‘कचोरी’. हा एक प्रसिद्ध भारतीय खाद्य पदार्थ असून तो उत्तर भारतामध्ये विशेष प्रसिद्ध आहे. कचोरी नाष्टा किंवा इतर कोणत्याही वेळेस खाल्ली जाते. कचोरी बनवताना अनके साहित्यांचा आणि पदार्थांचा वापर होतो.

साहित्य: 2 वाटी गव्हाचे पीठ, 2 वाटी मटार, 4 उकडलेले बटाटे, 1 इंच आल्याचा तुकडा, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, चार हिरव्या मिरच्या, 1-1 चमचा धने व बडीसौफ , 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा तिखट, 1/2 चमचा हळद, चवीनुसार मीठ, बारिक चिरलेली कोथिंबीर आणि तेल.

कृती: सर्वप्रथम कणकीच्या पीठामध्ये चवीनुसार मीठ आणि मग तेलाचे मोहन घालून ते पीठ मळून घ्यावे. मळलेले पीठ घट्ट भिजवून झाकून ठेवावे. मटार उकळत्या पाण्यात शिजवून पाणी गाळून घ्यावे. मिरची, आलं, लसणाची पेस्ट थोड्याश्‍या तेलात परतून घ्यावी.

बटाटे व मटर कुसकरून त्यात परतलेली पेस्ट व इतर सर्व मसाले घालून त्याचे साधारण लाडू एवढे गोळे तयार करून घ्यावे. कणकीच्या पीठाची लाटून पुरी तयार करावी. त्या हे लाडूच्या आकाराचे सारण भरून कचोरी तयार करावी. एका फ्रांइग पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल घेऊन कचोऱ्या ठेवून वरतून थोडे-थोडे तेल सोडावे. मग झाकण ठेवून कचोऱ्या दोन्हीकडून वाफवून घ्याव्यात. चिंचेच्या किंवा हिरव्या चटणीसोबत कचोरी खुप छान लागते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.