रश्मी बागल यांना कोंडीत पकडण्यासाठी ‘पवार’ नीती 

सोलापूर – करमाळा विधानसभा मतदासंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने संजय पाटील (घाटणेकर) यांना उमेदवारी दिली होती. त्यानुसार संजय पाटील यांनी उमेदवारीचा अर्जही भरला होता. परंतु, राष्ट्रवादीने आज एक पत्रक जारी करत संजय शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. तसेच संजय शिंदेंच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. याची माहिती राष्ट्रवादीने एक पत्रकाद्वारे दिली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत आता करमाळा मतदारसंघाची एकूणच गणिते बदलणार आहेत.

करमाळा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेवारीवरून चांगलेच रान पेटले आहे. या मतदारसंघातून शिवसेनेने रश्मी बागल यांना उमेदवारी जाहीर केली होती. तर, राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या रश्मी बागल यांना कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. रश्मी यांची चहुबाजूने कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीने संजय शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

दरम्यान, संजय शिंदे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तसेच माढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष आणि आ.बबनदादा शिंदे यांचे बंधू आहेत. त्यांनी सन २०१४ विधानसभा निवडणूकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करमाळा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविली होती. तर २०१९ ची लोकसभा निवडणुकीदरम्यान संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)