रस्त्यावरील प्लास्टिक द्या अन् मोफत पोटभर जेवण करा 

नवी दिल्ली – रस्त्यावरचे प्लास्टिक द्या आणि मोफत जेवण करा, असे कधी तुम्ही ऐकले किंवा पहिले आहे का? नाही ना. परंतु, देशात असाच एक कॅफे सुरु होत आहे. देशातील या पहिल्या गार्बेज कॅफेचे उद्घाटन आरोग्यमंत्री टी. एस. सिंहदेव आज करणार आहेत. या गार्बेज कॅफेचे सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.

प्लॅस्टिकपासून वातावरणाला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचते. ही हानी रोखण्यासाठी छत्तीसगडस्थित अंबिकापूरमधील प्रशासनाने आगळे-वेगळी शक्कल लढवली आहे. प्लास्टिक कचऱ्याच्या बदल्यात नागरिकांना मोफत जेवण देण्यासाठी गार्बेज कॅफेची सुरुवात करण्यात आली आहे. हे गार्बेज कॅफे २४ तास खुले राहणार आहे.

गार्बेज कॅफेमध्ये एक किलो प्लास्टिक दिल्यास पोटभर जेवण मिळणार आहे. तसेच ५०० ग्रॅम प्लास्टिक दिल्यास तुम्हाला ब्रेकफास्ट देण्यात येणार आहे. या कॅफेत गोळा होणाऱ्या प्लास्टिकपासून रस्ता बनविण्यात येणार आहे. याआधीही शहरांमध्ये प्लॅस्टिकच्या तुकड्यांपासून रस्ते बनविण्यात आले आहेत.

दरम्यान, या गार्बेज कॅफेसाठी अर्थसंकल्पातून ५ लाखांचा निधी देण्यात आला आहे. यानुसार अंबिकापूर प्रशासन गरीब लोकांना मोफत जेवण देणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×