माढ्यासह सोलापूरवर पवारांचे बारकाईने लक्ष

घडामोडींचा अहवाल दर दोन दिवसांनी पाठवण्याचे आदेश

सातारा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यासह सोलापूर लोकसभा मतदारसंघातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. सोलापूर मतदारसंघात घडणाऱ्या घडामोडींचा अहवाल दर दोन दिवसाला पाठवा, असे आदेशही त्यांनी राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांना दिले आहेत. माढा मतदारसंघात थोरल्या पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
मतदारसंघ माढा व बारामतीला पाडा या खोचक सोशल मेसेजमुळे पवारांनी माढ्यातून माघार घेतली. मात्र संजय मामा शिंदे यांना दगाफटका होऊ नये याकरिता पवारांनी खास पध्दतीने यंत्रणा कामाला लावली आहे.

शरद पवार यांनी बुधवारी शहरात दोन सभा घेतल्या. मात्र बातमी मागची बातमी म्हणजे विरोधकांच्या वेळापत्रकांची सखोल माहिती घेऊन बराच वेळ तळ सोलापुरात दिला. माढा लोकसभा मतदारसंघाचाही त्यांनी स्वतंत्र आढावा घेतला. तसेच बूथनिहाय रचना व तुलनात्मक राजकीय बलाबल ही पवारांनी अभ्यासपूर्ण तपासले. यंत्रमाग धारकांसोबत बैठक घेतली.
राष्ट्रवादी भवनात घेतलेल्या बैठकीत त्यांनी माढा मतदारसंघात येणाजया तालुक्‍यातील नेत्यांच्या बैठका घेतल्या. त्यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला. पवारांनी कालच्या पत्रकार परिषदेत धनगर आरक्षण, मुस्लीम व मागासवर्गीय समाजावर होणारे अत्याचार याबाबत भाष्य केले होते. माढा मतदारसंघातील प्रचारात राष्ट्रवादीचे नेते या मुद्यांवर चर्चा घडवून आणणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पवारांनी सायंकाळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी दोन्ही नेत्यांनी रणनितीवर चर्चा केल्याचे समजते.

पवार गुरुवारी रात्री सोलापूर मुक्कामी होते. गुरुवारी सकाळी त्यांनी परत जाताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्याशी चर्चा केली. निवडणुकीतील व्यूहरचनेबाबत काही शंका असतील तर त्या आताच सांगा, असे सांगून शहराच्या विविध भागातून होणारे मतदान आणि शहरवासीयांची भूमिका याबद्दलही माहिती घेतली.शहरातील विविध क्षेत्रात काम करणारी मंडळी पवारांना भेटायला आली होती. या मंडळींकडून पवारांनी शहराचा कौलही जाणून घेतला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.