मौल्यवान वस्तु, रक्कम सोडण्याचा घेणार निर्णय
नगर – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने विविध कामांसाठी नियुक्त केलेल्या पथकांनी जप्त केलेल्या मौलवान वस्तू, रक्कम सोडण्याचा निर्णय घेण्यासाठी नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने हे या दोन्ही समित्यांचे अध्यक्ष असून नगर लोकसभा मतदारसंघासाठी खर्च संनियंत्रण पथकाचे नोडल अधिकारी श्रीकांत अनारसे आणि खर्च नियंत्रण कक्षाचे समन्वयक तथा जिल्हा कोषागार अधिकारी महेश घोडके यांचा या समितीत समावेश आहे.शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी माने यांच्या अध्यक्षतेखालील समितीत खर्च संनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी विजय कोते आणि जिल्हा कोषागार अधिकारी तथा समन्वयक खर्च सनियंत्रण कक्ष महेश घोडके यांचा समावेश आहे. समिती ही जप्त केलेल्या रकमेबाबत तसेच मौल्यवान वस्तूंबाबत वस्तुस्थिती तपासून निर्णय घेणार आहे. तरी याबाबत काय निर्णय होतो याची सर्वांना प्रतिक्षा आहे.