मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे निदान करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. लवकरच शरद पवारांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचीही माहिती राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती ठीक होण्यासाठी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षही प्रार्थना करत आहे.
भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले कि, पवार साहेब लवकर बरे व्हा! नियोजित शस्त्रक्रिया यशस्वी होऊन आपण लवकर बरे व्हावे, हीच ईश्वराकडे प्रार्थना. पक्षभेदापलीकडचे प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यांचे ‘मार्गदर्शक’ आहात तुम्ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील ‘आधारवड’ आहात तुम्ही, असे ट्विट त्यांनी केले आहे.
पवार साहेब लवकर बरे व्हा !
नियोजित शस्त्रक्रिया यशस्वी होऊन आपण लवकर बरे व्हावे, हीच ईश्वराकडे प्रार्थना
पक्षभेदापलीकडचे प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यांचे ‘मार्गदर्शक’ आहात तुम्ही
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील ‘आधारवड’ आहात तुम्ही.
Get well soon@PawarSpeaks साहेब काळजी घ्या!— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) March 29, 2021
अतुळ भातखळकर यांनीही शरद पवार यांची शस्त्रक्रिया यशस्वी होवो व ते लवकरात लवकर बरे होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
तर, चित्रा वाघ यांनी साहेब….लवकर बरे व्हा ही श्री स्वामींचरणी प्रार्थना, असे म्हंटले आहे.
साहेब….लवकर बरे व्हा हि श्री स्वामींचरणी प्रार्थना…🙏 @PawarSpeaks
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 29, 2021