न्यूयॉर्क – एका प्रवाशाचा लॅपटॉप अचानक पेटल्यामुळे जेट ब्लू कंपनीचे विमान उड्डाणापूर्वीच थांबविण्यात आले आणि सर्व प्रवाशांना विमानाबाहेर उतरवण्यात आले. अमेरिकेत “जेएफके’ आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. विमानतळावरील गेट नं. 5 वर विमान उभे केले जात असताना विमानातील एका प्रवाशाकडील लॅपटॉपमधील लिथियम बॅटरीने पेट घेतला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
विमानातील कर्मचाऱ्यांनी लॅपटॉपची आग त्वरित विझवली. त्यानंतर विमानातील सर्व 67 प्रवाशांना इमर्जन्सी स्लाईड सिस्टिममधून तर उर्वरित 60 प्रवाशांना नेहमीच्या मार्गाने बाहेर काढण्यात आले. या धावपळीदरम्यान 7 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली, असे विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाचा “एफएए’ आणि “एनटीएसबी’बरोबरच्या समन्वयाने तपास केला जात आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.