शुल्कवाढी विरोधात पालक एकवटले !

पंचायत समितीवर मोर्चा : विद्यार्थ्यांच्या नुकसानीस शाळाच जबाबदार असल्याचा आरोप

वडगाव मावळ – शिक्षणाची गंगा बहुजनाच्या घरात पोहचविण्याचे कार्य करणाऱ्या येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलने अचानक दुप्पटीने फी वाढ केल्याच्या विरोधात विद्यार्थी व पालकांनी मावळ पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि. 8) दुपारी धाव घेत लेखी तक्रार दिली. जोपर्यंत फी वाढ कमी होणार नाही, तोपर्यंत विद्यार्थी शाळेत जाणार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस शाळाच जबाबदार राहणार असल्याचे पालकांनी गटशिक्षणाधिकारी मंगल वाव्हळ यांना लेखी निवेदन दिले. अशी परीस्थिती मावळ तालुक्‍यातील अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळेत आहे. 2009 शिक्षणाचा हक्‍क कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही, असाही सूर आंदोलकांनी अळविला.
सन 2013 साली रयत शिक्षण संस्थेच्या आवारात स्थापन करण्यात आली.

या शाळेत केवळ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने असलेल्या अनेक पालकांचे याच शाळेत शिक्षण पूर्ण झाल्याने या शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. या शाळेत सद्यस्थितीला 210 विद्यार्थी आहेत. या शाळेत गरीब-गरजू पालकांची मुले आहेत. या मुलांना आठ हजार 440 वार्षिक शैक्षणिक शुल्क होते. 1 एप्रिलमध्ये शाळा सुरू झाल्याने अचानक विद्यार्थ्यांच्या पालकांना 3 एप्रिल रोजी विद्यार्थ्यांची वार्षिक शैक्षणिक शुल्क पंधरा हजार रुपये झाल्याचे सांगितले. वाढीव शुल्क भर अथवा विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार नाही. त्याचे प्रवेश रद्द करू अशी तंबी पालकांना दिली.

विद्यार्थी व पालकांनी सोमवारी (दि. 8) सरळ मावळ पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी मंगल वाव्हळ यांच्या कार्यालय गाठून विद्यार्थी व पालक यांनी या शाळेत पालक शिक्षक संघांची स्थापना केलेली नाही. शाळेत मनमानी फी वाढविली जाते. त्यातच प्रवेश घेण्यासाठी विकासानिधीच्या नावाखाली हजारोंच्या देणग्या घेवूनच विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. शैक्षणिक साहित्य जबरीने वाढीव किमंतीने विकतात. त्यातच सांस्कृतिक कार्यक्रम फी, संगणक फी, सहल फी इतके झाल्यावर मुलांची शैक्षणिक प्रगती होता नसल्याने त्यांना खासगी शिकवणी यात आमची फसवणूक केली जात आहे.

या शाळेत आमच्या मुलांना पायाभूत सुविधांचा अभाव आहे. क्रीडांगण, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, वर्गात पंखे नाहीत. केवळ शैक्षणिक शुल्क वाढविले जाते. शुल्क हे धनादेशाद्वारे न घेता रोख रक्कमेत देण्याची सक्‍ती करतात. शाळेत उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक नाहीत. जे आहेत ते 4 महिन्यांत नोकरी सोडतात. मुख्याध्यापक आणि शिक्षकांची पालकांसोबत सौजन्याची भाषा नसते. शाळेचे व्यवस्थापन पालकांना विश्‍वासात घेत नाही. शिक्षक वेळेवर येत नाहीत. केवळ फी वाढविण्यात येते. पण विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा देण्यात शाळा मागे आहे, अशी तक्रार पालक नितीन धोंगडे, अमोल बांगर, कमाल सहनी, रामेश्‍वर नवघणे, नवनाथ नवघणे, सुधाकर काळे, विद्या घोणमोडे, सुषमा बागडे, नंदकुमार बारवकर, अनिल पोटवडे, बाळासाहेब राठोड, आरती सोनवणे, बिना विश्‍वकर्मा, संध्या डोंगरे, शीतल वीर आदींसह शेकडो पालकांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.