मनुष्यबळाअभावी पोलीस आयुक्‍तांची तारेवरची कसरत

पिंपरी  – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांच्या केवळ रजाच नव्हे तर साप्ताहिक सुट्याही बंद करण्यात आल्या आहेत. या बाबत पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी आदेश दिले आहेत. उपलब्ध मनुष्यबळावरच निवडणूक कार्यकाळात काम करायचे असल्याने आयुक्तांना तारेवरची कसरत कारवी लागत आहे.

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तलयामध्ये सध्या 1,804 इतके पोलीस मनुष्यबळ उपलब्ध आहे. यातील अत्यावश्‍यक सेवांसाठी नियुक्त केलेले पोलीस वगळता निवडणूक कामकाज आणि बंदोबस्तासाठी उपलब्ध करून देण्यात आले असून त्यांची संख्या 1,404 इतकी आहे. बूथ आणि मतदारांची संख्या लक्षात घेता एकूण 3,404 इतके मनुष्यबळ लागणार असल्याचे आयुक्‍त कार्यालयाचे म्हणणे आहे.

पोलीस महासंचालकांकडून अतिरिक्त मनुष्यबळ देखील उपलब्ध होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. मात्र, किती मनुष्यबळ उपलब्ध होईल, याबाबत अधिकाऱ्यांना निश्‍चित सांगता येत नसल्यामुळे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचा पुरेपूर वापर केला जाणार आहे. त्यामुळे 1 ते 30 एप्रिल या काळात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रकारच्या रजा बंद करण्यात आल्या आहेत. सध्याची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाची स्थिती पाहता कर्मचाऱ्यांवर अतिरिक्‍त ताण येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.