लातूर – रेणापूर-लातूर महामार्गावर ट्रकने एका दुचाकीस्वारास चिरडल्याची दुर्घटना घडली. हा अपघात आज सकाळी रामवाडी (ता. रेणापूर) येथून प्रदीप गोपाळराव गोडभरले हे दुचाकीवरून लातूरकडे येत असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिल्याने यात गोडभरले हे जागीच ठार झाले.
प्रदीप गोपाळ गोडभरले (वय 58) हे लातूर येथे राहतात. सकाळी 6 वाजता रामवाडीला जावून ते दुचाकीवरून गव्हाचा कट्टा घेवून लातूरकडे दुचाकीवरून येत होते. महापूर पाटीसमोर रोडवर पाठीमागून येणारी ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने प्रदीप गोडभरले यांचा जागीच मृत्यू झाला. या रस्त्याचे काम चालू असल्याने वाहनांची गर्दी रस्त्याच्या अर्ध्या भागातूनच होत आहे.