मुंबई : सध्या विधानपरिषदेची निवडणूक लागली असून या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत भाजपकडून पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना डावलण्यात आले आहे. दरम्यान, उमेदवारी न मिळाल्याने पंकजा मुंडे यांचे समर्थक नाराज झाले आहेत. अशातच पंकजा मुंडे या 21 जूनला पाथर्डीतील मोहटा देवीचे दर्शन घेणार आहेत. यावेळी त्या पाथर्डीतील भाजप कार्यकर्त्यांशी साधणार संवाद साधणार आहेत.
पंकजा मुंडे या 21 जूनला मोहटा देवीचे दर्शन घेणार आहेत. यावेळी त्या पाथर्डीतील भाजप कार्यकर्त्यांशी साधणार संवाद साधणार आहेत. तसेच यावेळी त्या मुकुंद गर्जे या कार्यकर्त्याचीही घेणार भेट घेणार आहेत. पंकजा मुंडे यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर मुकुंद गर्जे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता पंकजा मुंडे त्या कार्यकर्त्याची भेट घेणार आहेत.
दरम्यान, 21 जूनच्या पंकजा मुंडे यांच्या स्वागताची कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. ‘चलो मोहटादेवी’ असे बॅनर सोशल मीडियावर झळकत असताना दिसत आहेत. भाजपकडून पंकजा मुंडे यांना डावलल्याची कार्यकर्त्यांकडून भावना व्यक्त केली जात आहे. आता त्यावर पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळं पंकजा मुंडेंच्या दौऱ्याकडं सर्वाचे लक्ष लागले आहे.