नवी दिल्ली , वृत्तसंस्था : भाजपच्या नेत्या आणि भोपाळ लोकसभा सदस्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना एका अज्ञात व्यक्तीकडून फोनवरून जीवे मारण्याची धमकी आली आहे. शुक्रवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास साध्वीला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. कॉलरने स्वत:ला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचा माणूस म्हणून ओळख सांगितली. आणि साध्वी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
जेव्हा साध्वी प्रज्ञा यांनी त्या संबंधित व्यक्तीला का जीवे मारणार आहे ? असे विचारले ‘तेव्हा लवकरच समजेल… ‘ असे त्याने उत्तर दिले. यावर साध्वीने त्याला सांगितले की, माझा मृत्यू कधी होईल, मला कसे कळेल? करणं माझ्या मृत्यूनंतर मला समजणार नाही तू मला आधीच सांग असे साध्वीने सांगितले. त्यावर समोरून उत्तर आले की, मुस्लिमांवर संताप व्यक्त करणे , मुस्लिमांना लक्ष्य करणे आणि मुस्लिमांचा द्वेष करणे. आम्ही तुम्हाला सोडणार नाही, आमचा माणूस मारायला आला की समोर सांगेल. असे उत्तर धमकी देणाऱ्या व्यक्तीकडून आले. त्यानंतर मात्र साध्वी प्रज्ञा यांनी देखील त्या व्यक्तीला सडेतोड उत्तर दिले. हिम्मत असेल तर येऊन दाखव. धमकीचा हा व्हिडिओ इंटरनेट मीडियावरही चांगलाच व्हायरल होत आहे.
उल्लेखनीय आहे की, साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी नुकतेच नुपूर शर्माच्या समर्थनार्थ वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, खरे बोलणे म्हणजे बंडखोरी असेल तर समजून घ्या की आम्हीही बंडखोर आहोत. त्यांनी ट्विट करून लिहिले की, ‘सत्य बोलणे म्हणजे बंडखोरी असेल, तर समजून घ्या की आम्हीही बंडखोर आहोत. जय सनातन जय हिंदुत्व. असे ट्विट त्यांनी केले होते.