अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी तिच्या पहिल्याच ‘बिजली-बिजली’ या सुपरहिट गाण्यानंतर मोठी स्टार बनली आहे. पलकने तिच्या अभिनय आणि नृत्याने फॅशन जगतातही अधिराज्य गाजवले आहे. अलीकडच्या दिल्ली टाइम्स फॅशन वीकमध्ये पलकने तिच्या ग्लॅमरस लुकने धुमाकूळ घातली.
पलक तिवारी स्मार्ट वॉच ब्रँड फायर-बोल्टची शोस्टॉपर बनली. पलकने रॅम्पवर तिच्या ऑल ब्लॅक लूकमध्ये सर्वांना वेड लावले. पलकने काळ्या लेदर पॅंटसह काळ्या रंगाचे जाकीट कॅरी केले. जॅकेटसोबत तिने डिझायनर ब्रॅलेट धारण केले होते, ज्यामुळे ती सुपर सिझलिंग दिसत होती. चमकदार मेकअप आणि खुल्या केसांमध्ये पलक तिवारी एकदम भारी दिसते होती.
पलकने मोठ्या आत्मविश्वासाने रॅम्प वॉक करून अनेकांची मने जिंकली. पण असे अनेक लोक आहेत ज्यांना पलकने केलेला रॅम्प वॉक आवडला नाही आणि पलकच्या रॅम्प वॉकवरून सोशल मीडिया युजर्स प्रचंड ट्रोल करत होते.
पलक तिवारीचा रॅम्प वॉकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पलक चेहऱ्यावर स्मित हास्य ठेऊन चालत होती. पण तिच्या रॅम्प वॉकवरून अनेक यूजर्स पलकला ट्रोल करत आहेत. एका युजरने लिहिले – रॅम्प वॉक भयानक आहे, तिने रिहर्सल केली नाही का? यूजर्सने लिहिले – बकवास.तिला रॅम्प वॉक माहित नाही.