वॉशिंग्टन – डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष असतानाच या कालावधीमध्ये अमेरिका फर्स्ट हे धोरण राबवण्यास प्रारंभ झाला होता त्यामध्ये ग्रीन कार्डच्या नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले होते आणि परदेशी लोकांना नोकरीसाठी अमेरिकेत अनेक बंधने लादण्यात आली होती आता या धोरणाचा फटका अमेरिकेला बसत असून तंत्रज्ञानाच्या उद्योगांमध्ये मागे पडण्याची भीती आता अमेरिकेला सतावत आहे तज्ञ व्यावसायिक आणि अभियंत्यांच्या टंचाईमुळे अमेरिकेची सेमीकंडक्टर इंडस्ट्री अडचणीत आली आहे.
या अडचणीवर मात करण्यासाठीच अमेरिकन संसद विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील परदेशी व्यावसायिकांनी अमेरिकेकडे आकर्षित व्हावे म्हणून ग्रीन कार्डच्या नियमांमध्ये बदल करण्याचा विचार सुरू केला असल्याचे समजते या प्रकारचा विचार करण्याची मागणी करणारे पत्र अमेरिकेतील 50 माजी संरक्षण अधिकार्यांनी संसदेला पाठवले आहे ऍरिझोना राज्यामध्ये परदेशी तज्ञाची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत असल्याचे निरीक्षण या पत्रात नोंदवण्यात आले आहे.
एकोणीशे नव्वद मध्ये अमेरिकेत जगातील एकूण सेमीकंडक्टर च्या उत्पादनापैकी 40 टक्के उत्पादन घेतले जात होते आज या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे सेमीकंडक्टर उत्पादनांमध्ये अमेरिकेचा हिस्सा फक्त दहा टक्के राहिला आहे तिकडे याच उत्पादनावर चीनने मोठ्या प्रमाणावर प्रभाव निर्माण केला असून जागतिक बाजारपेठ काबीज केली आहे.
आगामी कालावधीमध्ये चीनच्या या आव्हानाचा मुकाबला करायचा असेल तर भारत आणि इतर काही देशांमधील प्रतिभावंत अभियंत्यांना अमेरिकेमध्ये प्रवेश द्यायला हवा अशा प्रकारचा विचार आता अमेरिकेत सुरू झाला आहे गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेमध्ये ग्रीन कार्डचे नियम कडक झाल्यानंतर अनेक प्रतिभावंत अभियंत्यांनी अमेरिका सोडून कॅनडा मध्ये नोकरी पत्करल्याच्या घटनाही घडल्या आहेत ही स्थिती पाहता येत्या काही कालावधी मध्ये किमान भारतीय अभियंत्यांसाठी अमेरिकेतील ग्रीन कार्डचे नियम शिथिल केले जातील अशी शक्यता दिसत आहे.