#T20WorldCup #INDvPAK | पाकचा टाॅस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय

दुबई :- टी-20 विश्‍वचषक स्पर्धेमध्ये आज (रविवारी) भारत आपला पहिला सामना खेळणार आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तानविरोधातील सामन्याने भारत या स्पर्धेमध्ये पुन्हा जेतेपद जिंकण्यासाठीची मोहीम सुरू करणार आहे. या सामन्याकडे नेहमीप्रमाणे संपूर्ण क्रीडा विश्‍वाची नजर लागलेली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा पाकिस्तानच्या बाजूने लागला असून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने क्षेत्ररक्षण स्विकारताना  भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.

दरम्यान, दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धचा नाबाद राहण्याचा विक्रम कायम ठेवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत भारताला पहिल्यांदाच पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.

भारतीय संघ – केएल राहुल, आर शर्मा, व्ही कोहली, एस यादव, आर पंत, एच पांड्या, आर जडेजा, बी कुमार, व्ही चक्रवर्ती, एम शमी, जे बुमराह

पाक संघ – बी आझम, मोहम्मद रिझवान, एफ जमान, एम हफीज, एस मलिक, ए अली, एस खान, मी वसीम, एच अली, एच रौफ, एस आफ्रिदी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.