pakistan election result। पाकिस्तानमध्ये नुकत्याच सार्वत्रिक निवडणूक पार पडल्या आहेत. या निवडणुकांची मतमोजणी अजूनही सुरुय. यामध्ये नवाज शरीफ यांच्या पक्षाच्या हाती पाकिस्तानच्या सत्तेच्या चाव्या मिळतील असे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. मात्र तुरुंगातून पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पार्टीचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या पक्षाने देखील या निवडणुकीत जादू केलीय.
इम्रान खान यांच्या पक्षाच्या सर्व उमेदवारांनी नवाज शरीफ यांच्या पक्षाच्या उमेदवारांना मागे टाकले आहे. इम्रान खान यांना निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठीच त्यानं तुरुंगात टाकण्यात आल्याचे म्हटले जात होते. मात्र आतापर्यंत आलेल्या सर्व जागांच्या निकालानुसार त्यांच्या पक्षाने पाठिंबा दिलेल्या उमेदवारांच्या विजयाने शरीफ यांच्या पक्षाचे मनसुबे उधळून लावले आहेत.
हेही वाचा
पाकिस्तानात 76 वर्षात 29 पंतप्रधान; एकानेही पूर्ण केली नाहीत 5 वर्षे
दरम्यान, निवडणूक निकालानुसार २६६ जागेसाठी होत असलेल्या निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षच्या उमेदवारांनी ९६ जागा जिंकल्या आहेत. नवाज शरीफ यांच्या पीएमएल- एनला ६६ जागा मिळाल्या. यासोबतच पाकिस्तान पीपल्स पार्टीने जवळपास ५१ जागांवर विजय मिळवला आहे. MQM-P ने 14 जागा, PML 3 जागा, IPP दोन जागा, JUI-P दोन जागा आणि PNAP आणि MWM ने प्रत्येकी एक जागा जिंकली.
एकत्र सरकार बनवू : नवाझ शरीफ pakistan election result।
पीएमएल-एनचे प्रमुख नवाझ शरीफ म्हणाले की, सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याची गरज आहे. ज्यामुळे देशाला या कठीण परिस्थितीतून बाहेर काढता येईल.
केंद्रात सरकार स्थापन करणार : पीटीआय pakistan election result।
इम्रान खान यांच्या पक्षानेनेही सरकार स्थापनेचा दावा केला आहे. पंजाब, खैबर पख्तूनख्वा आणि केंद्रात आम्हाला बहुमत मिळाल्याचे पक्षाने म्हटलं.
अपक्ष उमेदवार गेम चेंजर्स ठरणार pakistan election result।
निवडणूक आयोगाने इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयचे निवडणूक चिन्ह रद्द केले होते, त्यानंतर त्यांच्या पक्षाचे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. आता हे अपक्ष निवडणुकीचा खेळ बिघडू शकतात. प्रत्यक्षात निवडणुकीत विजयी होणारे उमेदवार खासदार होतील तर अपक्षांना निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षात जाण्याचा पर्याय असेल.