Tokyo Olympics : पी. व्ही. सिंधू पदकाच्या समीप

टोकियो – भारतीय शटलर आणि जागतिक मानांकनात सहाव्या स्थानावर असलेली पी. व्ही. सिंधू टोकियो ऑलिंपिकमध्ये पदकाच्या दिशेने जोरदार वाटचाल करत आहे. सिंधूचा उपांत्य फेरीत प्रवेश.

कालच्या विजयाने बाद फेरीत प्रवेश केलेल्या सिंधूने आजच्या सकाळी आपला पहिलाच सामना जिंकत पदकाच्या दिशेने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. तिने जागतिक मानांकनात 13 व्या स्थानावर असलेल्या डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डवर 21-15, 21-13 अशी मात करत बाद फेरीतही आपली विजयी वाटचाल कायम ठेवली आहे.

या सामन्यात पराभूत झालेली खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडणार होती. आपल्या पहिल्या बाद फेरीत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डशी खेळताना पहिल्या गेममध्ये सिंधूने 4-1 अशी आघाडी घेतली होती. सिंधूने पहिला गेम 21-15 ने जिंकला. सिंधूने यामध्ये ड्रॉप शॉट्‌स आणि स्मॅशेसच्या बळावर पॉइंट्‌स मिळवले.

22 मिनिटांच्या पहिल्या सेटमध्ये ती खूपच कंट्रोलमध्ये दिसली. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने ब्लिचफेल्डला प्रतिकाराची फारशी संधीच दिली नाही. सिंधूने हा गेमही 21-13 असा जिंकत 41 मिनिटांच्या सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजवले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.