टोकियो – भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमला 51 किलो वजनी गटात हार पत्करावी लागली आहे. या पराभवामुळे मेरी कोम टोकियो ऑलिम्पिकमधून बाहेर पडलीय. आजच्या या पराभवामुळे तमाम भारतीयांना मोठा धक्का बसला आहे.
मेरी कोमकडून सर्वांना पदकाची अपेक्षा होती. महिला बॉक्सिंगच्या उपांत्यपूर्व फेरीत तिला कोलंबियाच्या तिसऱ्या मानांकित इंग्रीट वलेन्सियाकडून मेरी कोमला 3-2 असा पराभव पत्करावा लागला.
महिला 51 किलो गटात कोलंबियाच्या इंग्रीट वलेन्सियाकडून पराभव झाल्याने भारताच्या मेरी कोमचा ऑलिम्पिकमधील प्रवास संपुष्टात आला आहे.
पंचांनी व्हॅलेन्सियाला अनुक्रमे 30, 29, 27, 29 आणि 28 गुण दिले. त्याच वेळी मेरी कोमला 27, 28, 30, 28 आणि 29 गुण मिळाले.