सातारा -जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 75 नागरिकांना दहा दिवसांनतर शनिवारी घरी सोडण्यात आले. 675 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
शनिवारी डिस्चार्ज दिलेल्यांमध्ये जावळी तालुक्यातील पुनवडी येथील वय 48, 19, 50, 30, 62, 40, 10, 18, 31, 54, 56 वर्षीय महिला व वय 30, 9, 22, 20, 43, 21, 25 वर्षीय पुरुष, मुनावळे येथील 42 वर्षीय पुरुष., सातारा तालुक्यातील खावली येथील 63 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 65 वर्षीय महिला, 37 व 40 वर्षीय पुरुष, करंडी येथील 43 वर्षीय महिला व 61, 30 वर्षीय पुरुष, कोडोली येथील 28, 5, 17, 38 वर्षीय महिला व 25, 15, 45 वर्षीय पुरुष, कारंडवाडी येथील 23 वर्षीय महिला,
नागठाणे येथील 43 वर्षीय महिला, खिंडवाडी येथील 44 वर्षीय पुरुष, वावदरे येथील 30 वर्षीय पुरुष, धनगरवाडी येथील 26 वर्षीय महिला., कराड तालुक्यातील किवळ येथील 36 वर्षीय पुरुष, बेलावडे येथील 31 वर्षीय महिला, चचेगाव येथील 42 वर्षीय महिला, चरेगाव येथील 38 वर्षीय पुरुष.,
वाई तालुक्यातील परखंदी येथील 45, 68 वर्षीय पुरुष, बावधन येथील 28 वर्षीय पुरुष, आसले येथील 24 वर्षीय पुरुष, 20 वर्षीय महिला, बदेवाडी येथील 65, 35, 11, 40 वर्षीय महिला व 8, 25 वर्षीय पुरुष, गंगापुरी येथील 48 वर्षीय महिला व 12 वर्षीय मुलगी, नावेचीवाडी येथील 21 वर्षीय युवक, फुलेनगर येथील 32, 26, 28 वर्षीय पुरुष व 24, 39, 50 वर्षीय महिला,
खटाव तालुक्यातील निमसोड येथील 19 वर्षीय युवती., खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील कुंभार आळीतील 28 वर्षीय पुरुष, बाजारपेठेतील 32 वर्षीय पुरुष, रामोशी आळी येथील 30, 15, 17, 37 वर्षीय महिला, ग्रामपंचायत येथील 53 वर्षीय पुरुष., पाटण तालुक्यातील कसणी येथील 60 वर्षीय पुरुष व 26 वर्षीय महिला, तारळे येथील 34 वर्षीय महिला व 45 वर्षीय पुरुष, सूर्यवंशीवाडी येथील 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.