‘महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड!

रोहित पवारांनी खास शब्दात शरद पवारांचं वर्णन करत दिल्या शुभेच्छा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, शरद पवार यांचे नातू व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या. ‘महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड’, अशा शब्दांत रोहित पवारांनी शरद पवारांचे वर्णन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

‘महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड! आदरणीय पवार साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शतायुषी व्हा आणि माझ्यासारख्या युवांना आणि नव्या पिढीला कायम मार्गदर्शन करत रहा’, असं ट्विट रोहित पवारांनी केले आहे.

दरम्यान, कोणत्याही संकटापुढे झुकायचे नाही ही शिकवण आजोबांकडून मिळाल्याचे रोहित पवार यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं. “अनेक लोकांना शरद पवार निवृत्त होतील असं वाटलं होतं. पण ते म्हणाले आपण हार मानायची नाही. कितीही संकटं आली तरी झुकायचं नाही, प्रामाणिक वागा, लोकांमध्ये जा, मग कोणीही तुमचा पराभव करु शकत नाही, हे पवार साहेबांकडे पाहून आम्हाला कळतं”, असं ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.