Pune Cyclothon Competition – चॅम्प एन्ड्युरन्स आयोजित पुनीत बालन ग्रुप प्रायोजित आणि फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग यांनी प्रायोजित केलेल्या तिसऱ्या आपला पुणे सायक्लोथॉन स्पर्धेत ओम कारंडे, बिजेन कुमार, मायकेल लेहनिग, अंजली रानवडे, अरुनिमा पी, अंजली भालिंगे यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
स्पर्धेत ६०००हून अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. एलिट गटात ६० किमी प्रकारात पुरुषांमध्ये अहमदनगरच्या ओम कारंडे(०१:३१:३२से) याने प्रथम क्रमांक पटकावला, पुण्याच्या सुदर्शन देवर्डेकर(०१:३१:५२से) व सांगलीच्या अमन तांबोळी (०१:३१:६२से) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. महिला गटात पुण्याच्या अंजली रानवडे(०१:५६:४६से) याने प्रथम क्रमांक पटकावला.
१०० किमीमध्ये पुरुष गटात १६ ते ३५ वयोगटात बिजेन कुमार(०२:४४:३९से) याने विजेतेपद पटकावले. ३६ वर्षावरील गटात मायकेल लेहनिग(०२:४७:३३से) याने पहिला क्रमांक पटकावला. महिला गटात १६ ते ३५ वयोगटात अरुनीमा पी(०४:०७:१०से) हिने, तर ३६ वर्षावरील गटात अंजली भालिंगे(०३:११:१९ से) ने विजेतेपद पटकावले.
याशिवाय पुरुष गटात हर्ष पवार(१४ ते ३५ वयोगट, ०१:२४:१९से), किरण पवार(३६ वर्षावरील गट, ०१:२५:०९से), महिला गटात अंजली निंगवाल(१४ ते ३५ वयोगट०१:३६:३१से), गौरी गुमास्ते(३६ वर्षावरील गट, ०१:३६:३६से), २५किमी प्रकारात तनिश सक्सेना(१४ ते ३५ वयोगट, ००:४१:४८से), विक्रांत आळेकर(३६ वर्षावरील गट, ००:४१:५१से), महिला गटात अनन्या उपाध्याय(१४ ते ३५ वयोगट, ००:४६:४५से), यानपिंग यान(००:४७:३१से) यांनी आपापल्या गटात विजेतेपद मिळवले.
WPL 2024 : चॅम्पियन आरसीबीवर पडला पैशांचा पाऊस…! जाणून घ्या, किती मिळाली बक्षिसाची रक्कम…
स्पर्धेतील विजेत्यांना १० लाख रुपयांची रोख पारितोषिके तसेच, प्रायोजकांतर्फे खास भेटवस्तू व गिफ्ट हॅम्पर देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण कृष्ण प्रकाश(आयपीएस), पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, कमिशनर ऑफ कॉपोरेशन अँड रजिस्ट्रार सौरभ राव, रायफल शूटिंगमधील ऑलिम्पिक पदकविजेती अंजली भागवत, महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे, निवृत्त एडीजी राजेंद्र सिंग, राज्याच्या महिला व बालक विभागाचे आयुक्त प्रशांत ननावरे, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, अतिरिक्त सीपी राजन शर्मा, भारतीय सायकलिंग महासंघाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंगचे उपाध्यक्ष सुमित भाटिया, रोटरी पुणे डिस्ट्रिक्ट ३१३१चे मोहन चौबल, यतिश भट, अशोक शिंदे, न्यूट्रासिटीकल मॅन ऑफ इंडियाचे संदीप गुप्ता, झुव्हेंट्स हेल्थकेअर लिमिटेडचे संचालक श्रीराम बालसुब्रमण्यम, आरआयआयएमएस इन्स्टिट्यूटचे चेअरमन सूरज शर्मा, इंजिनियर्स हॉरीझॉनचे व्यवस्थापकीय संचालक संजय सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सायक्लोथॉनचे मुख्य संयोजक रविंद्र वाणी, संजना लाल, गौरव फिरोदिया, सुष्मा कोपीकर, मेहेर तिवारी, राजश्री वाणी आदी उपस्थित होते.