Lakshya Cup 2024 (Mumbai) :- सेनादलाच्या मार्कमनशिप युनिटच्या हिमांशू तलान याने लक्ष्य करंडक नेमबाजी स्पर्धेत वरिष्ठ गटाचे विजेतेपद मिळवले. ही स्पर्धा पनवेल येथील कर्नाळा स्पोर्टस अकादमी येथे पार पडली.
तलान याने २५१.२ गुण मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याने विजेतेपद मिळवताना महाराष्ट्राच्या मोहित गोवडा (२४९.०) याला मागे टाकले. अंतिम शर्यतीत तलानची सुरुवात फार सावध होती. तो पहिल्या पाच शॉटमध्ये अव्वल तिघांमध्येही नव्हता. मात्र पाच सेटच्या दुसऱ्या शॉटमध्ये त्याने दुसऱ्या क्रमांकावर मुसंडी मारली.
पहिल्या एलिमिनेशन राऊंडमध्ये पहिले स्थान मिळवले. त्याने १६ आणि १७ व्या शॉटमध्ये अचूक १० गुणांची कमाई केली. या लक्ष्य करंडक स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या तलानने विजेतेपदाच्या दीड लाख बक्षिसाची कमाई केली.
WPL 2024 : चॅम्पियन आरसीबीवर पडला पैशांचा पाऊस…! जाणून घ्या, किती मिळाली बक्षिसाची रक्कम…
निकाल –
वरिष्ठ गट – सुवर्ण – हिमांशू तलान (आर्मी) २५१.२, रौप्य – मोहित गोवडा (महाराष्ट्र) २४९.०, ब्राँझ – गुरजंत सिंग (आर्मी) २२८.२). ज्युनियर गट – सुवर्ण – ओजस्वी ठाकूर (पंजाब) २५२.०. रौप्य – तलवाल सिंग (हरियाना) २५१.५. ब्राँझ – अजय मलिक (नौदन) २२९.८.