सध्या करोनामुळे देशभरात लॉकडाऊन सुरू असल्याने सर्वजण घरातच बसून आहे. या काळात अनेक कलाकारांनी व्हिडिओ शेअर करत काय-काय करता येईल याबाबत मार्गदर्शन केले आहे. त्यातच बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने तिचा एक सुंदर फोटो नुकताच इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, “आमचे अंतःकरण, मन व आत्मा लॉकडाउनमध्ये बंदिस्त नाही.’
साराचा हा फोटो सोशल मीडियावर खुपच व्हायरल होत असून इंस्टाग्रामवर आतापर्यत 1.5 मिलियनहून अधिक जणांनी लाईक केले आहे. साराने सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनदरम्यान येणाऱ्या नैराश्यावर चाहत्यांनी कशा प्रकारे मात द्यावी, याबाबत काही टिप्सही दिल्या आहेत.
दरम्यान, वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास यापूर्वी साराही इम्तियाज अली यांच्या “लव आज कल’ या चित्रपटात झळकली होती. यात तिच्यासोबत कार्तिक आर्यनने मुख्य नायकाची भूमिका साकारली होती. यानंतर सारा आता “कुली नंबर-1′ या रीमेक चित्रपटात वरुण धवनसोबत काम करत आहे. याशिवाय ती “अतरंगी रे’मध्ये अक्षय कुमार आणि धनुषसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे.