जिल्हा परिषद शाळांच्या जागेची मालकी तपासणी करण्याचे आदेश 

नगर  – महानगरपालिका व नगरपालिका हद्दीतील जिल्हा परिषद शाळांच्या जागेची मालकी तपासणीचे आदेश शिक्षण समितीने दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा शिक्षण समितीच्या सभापती राजश्रीताई घुले यांच्या अध्यक्षतेखाली आज शिक्षण समितीची बैठक झाली.त्यात हा निर्णय घेताना या शाळेच्या जागांवर झालेले अतिक्रमणे आदी बाबी तपासण्याचे आदेश देण्यात आले.

या बैठकीत सहा ते अठरा वयोगटातील दिव्यांग बालकांचे ऑनलाइन अंपगत्व पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी सर्व तालुक्‍यांनी काळजी घेण्याबाबत तसेच जिल्हा शल्यचिकित्सांकडे पाठपुरावा करण्याच्या सुचना यावेळी करण्यात आल्या.

इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्तीपरीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी जादा तास घेण्यात यावेत,सर्व शाळातील अध्ययन स्तर पडताळणी करावे अशा सूचना सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी झालेल्या चर्चेत शिक्षण समितीचे सदस्य जालिंदर वाकचौरे,सुर्वणा जगताप,विमल अगवाण यांनी भाग घेतला.प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी तथा सचिव रमाकांत काठमोरे,उपशिक्षणाधिकारी अरूण धामणे आदी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)