डिसेंबर अखेरपर्यंत कांदा भाव खाणार

पुणे – अवकाळी पावसाचा कांदा पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे आवक घटून दर गगनाला भीडले आहेत. बुधवारी मार्केटयार्डातील घाऊक बाजारात उच्चांकी म्हणजे किलोला 130 रुपये भाव मिळाला. हे चढे दर डिसेंबर अखेरपर्यंत राहतील, असा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे.

मार्केटयार्डात जुन्या आणि नवीन कांद्याची प्रत्येकी 15 ट्रक आवक झाली. जुन्या कांद्याचा 90 ते 130 रुपये किलो तर, नवीनचा 70 ते 110 रुपये इतका दर होता. जुन्या कांद्याची आवक खेड, जुन्नर, शिरुर आणि आंबेगाव येथून झाली. तर, नवीनची श्रीगोंदा, कर्जत आणि जामखेड येथून झाली. अजूनही मार्केटयार्डात कांद्याची आवक जेमतेम आहे.

कांदा व्यापारी रितेश पोमण म्हणाले, मार्केटमध्ये दोन दिवसांपूर्वी तुर्की येथील कांद्याची आवक झाली. त्यालाही चांगला भाव मिळाला. हा कांदा 80 रुपये किलो दराने विकला गेला. देशातील 70 टक्‍के कांदा महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे पीकविला जातो. मात्र, यंदा दोन्ही राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे आवक घटून दर वाढले आहेत. दरम्यान, जानेवारीपासून नवीन कांद्याची आवक होईल, त्यानंतर दर उतरण्यास सुरुवात होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.