नवी दिल्ली – महिला आरक्षण विधेयकाबाबत बसपा सुप्रीमो मायावती यांनी माध्यमांशी बोलाताना आपली भूमिका स्पष्ट केली. मायावती म्हणाल्या की, आम्ही या विधेयकासोबत आहोत. पण, SC, ST/OBC कोटा देखील सुनिश्चित केला पाहिजे. लोकसंख्येनुसार 50 टक्के आरक्षण दिले तर बरे होईल. ( Women’s Reservation Bill, Mayawati Mayawati )
मायावती पत्रकार परिषदेत पुढे म्हणाल्या,’आधी एससी, एसटी आणि आता ओबीसी आरक्षणाशी खेळले जातेय. यावेळी महिला आरक्षण विधेयक मंजूर होईल, अशी आशा आहे. केंद्र सरकारने आणलेल्या या विधेयकाला माझा पाठिंबा असून. एससी/एसटी/ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी कोटा स्वतंत्रपणे सुरक्षित करण्यात यावा. तसे न झाल्यास या विभागांवर अन्याय होईल. मात्र, असे झाले नाही तरी आज मांडण्यात येणाऱ्या महिला आरक्षण विधेयकाला बसपा पक्ष पाठिंबा देणार.’ ( Women’s Reservation Bill, Mayawati Mayawati )
मायावती पुढे म्हणाल्या, जुन्या संसद भवनाला निरोप देण्यात आला. हे सहजासहजी विसरता येणार नाही. मला संसदेच्या दोन्ही सभागृहांना भेट देण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असून आजपासून नवीन संसदेचे उद्घाटन होत आहे, ज्याचे बसपा मनापासून स्वागत करते.’ ( Women’s Reservation Bill, Mayawati Mayawati )