देवळाली ते दानापूर दरम्यान रवाना
पुणे – देवळाली ते दानापूर यादरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या शेतकरी रेल्वेला शुक्रवारी “व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे हिरवा झेंडा दाखवला. कृषी आणि नाशवंत उत्पादनांच्या अखंड पुरवठ्यासाठी शेतकरी रेल्वे सुरू करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली होती.
शुक्रवारी देवळाली ते दानापूर या मार्गावर पहिली रेल्वे धावली. पहिल्या शेतकरी रेल्वेला शुक्रवारी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी हिरवा झेंडा दाखवला.
Indian Railways introduced first “Kisan Rail”, a special Parcel Train from Devlali (Maharashtra) to Danapur (Bihar)#KisanRail https://t.co/jKY6DTSTK1 pic.twitter.com/Z8fAkdgTDw
— Ministry of Railways (@RailMinIndia) August 7, 2020
यावेळी रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी, खाद्य आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे, कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री परशोत्तम रुपाला, कैलाश चौधरी, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, डॉ. नरेंद्र जाधव, आमदार सरोज अहिरे, रेल्वे बोर्डाचे सदस्य पुर्नेन्दू मिश्रा, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल आदी उपस्थित होते. नाशवंत पदार्थ, शेती उत्पादने यांची दूरवर होणारी वाहतूक सोपी व्हावी, असा यामागील हेतू आहे.