मुंबई : मागील काही दिवसांपासून देशात ज्यांच्यामुळे वादळ उठले आहे ते अदाणी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदाणी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन भेट झाली आहे.
या दोघांमध्ये बंद दाराआड दोन तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी पाहता या भेटीवरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगणार असल्याचे बोलले जात आहे. यावर आता अजित पवार यांनी माध्यमांशी बोलतांना आपलं मत व्यक्त केल आहे.
अजित पवार म्हणाले,’शरद पवार यांनी गौतम अदानी यांची भेट घेतली नाही. अदानी शरद पवार यांच्याकडे आले होते. उद्या कोणावर काही आरोप झाले. तर तो व्यक्ती कोणाचीही भेट घेऊ शकतो. आता ही भेट कशासाठी घेतली हे अजुनही समोर आलेले नाही. शरद पवार आणि गौतम अदानी यांची ओळख आहे, हे सर्वांना माहित आहे. ओळखीच्या व्यक्तीला भेटणे यात काही चूक आहे असं मला वाटत नाही.’ असं असेही ते म्हणाले आहे.