मुंबई – दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी पैलवान खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर आधारित एक सिनेमा करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. नुकतेच नागराज मंजुळे यांनी ‘खाशाबा’ या चित्रपटाचे पोस्टर आऊट केले आहे.
नागराज मंजुळे यांनी ‘खाशाबा’ या सिनेमाचं पोस्टर शेअर करत लिहिलं आहे, “ऑलम्पिकच्या इतिहासात भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव गौरवाने नोंदवणाऱ्या अत्यंत प्रतिभावंत पहिलवान खाशाबा जाधवांच्या आयुष्यावर मला चित्रपट करायला मिळतोय ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. फॅन्ड्री’, ‘सैराट’नंतर ‘खाशाबा’ हा माझा तिसरा मराठी चित्रपट असेल जो मी दिग्दर्शित करतोय. जिओ स्टुडिओ, ज्योती देशपांडेंसोबत ही माझी पहिलीच फिल्म आहे. निखिल साने सर फॅन्ड्रीपासून सोबत आहेतच. हा प्रवास नक्कीच रंजक आणि संस्मरणीय असेल”.
या पोस्टरमध्ये खाशाबा जाधव यांच्या फोटोची तडे पडलेली फ्रेम दिसत आहे. तर मेडलने त्यांचा चेहरा झाकलेला दिसत आहे. सध्या या चित्रपटाचे पोस्टर चांगलेच व्हायरल होत आहे. एक नवा क्रीडाविषयक सिनेमा नागराज मंजुळे प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत असल्याने अनेकांनी त्यांचे आभार मानले आहेत. देशभरातील कुस्तीपटूंसाठी खाशाबा जाधव हे एक प्रेरणास्थान आहे. त्यामुळे आता या चित्रपटाबाबतची आतुरता कुस्तीप्रेमींना लागली आहे.
View this post on Instagram
खाशाबा जाधव हे कुस्तीपटू होते. ते एकमेव भारतीय ऑलिम्पिक पदक विजेते आहेत. त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे भारताची मान उंचावली आहे. खाशाबा यांना भारत सरकारने मरणोत्तर अर्जुन पुरस्कारानेही गौरवले आहे.