पिंपरी, (प्रतिनिधी) – डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हटले की त्यांचा अभ्यास आणि त्यांनी घेतलेल्या शैक्षणिक पदव्या डोळ्यासमोर येतात. याचीच प्रेरणा घेत, डॉ.वंदना पेडणेकर यांच्या संकल्पनेतून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना म्हणून आय.आय.सी.एम.आर निगडी संस्थेच्या एमसीएच्या विद्यार्थ्यांनी सलग दहा तास अभ्यास केला.त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. यावेळी माधव पाटील यांनी विद्यार्थ्यांना एज्युकेशन टू अॅक्शन या विषयावर मार्गदर्शन केले.
अंघोळीची गोळी या संस्थेचे अध्यक्ष माधव पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या “एज्युकेशन टू अॅक्शन” या विषयावर व्याख्यानात म्हणाले की, डॉ. आंबेडकरांनी जर्मन, फ्रेंच, परशियन, पाली संस्कृत अशा भाषाही त्यांना अवगत होत्या. पीपल एज्युकेशन ट्रस्ट स्थापन करून गोर गरिबांसाठी शिक्षणाचे दरवाजेही अनेकांसाठी उघडले होते.
आपल्या कायद्याच्या शिक्षणाचा वापर करून त्यांनी राज्यघटनेमध्ये न्याय, स्वातंत्र्य आणि समता ही मूल्य देऊन करोडो भारतीयांना आत्मसन्मानाने जगायला शिकवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त पुस्तकी शिक्षण घेतले नाही तर, त्या शिक्षणावरती काम सुद्धा केले. आणि म्हणूनच विध्यार्थ्यांनी सुद्धा ” एडुकेशन टु अ ॅक्शन ” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तंत्र समाजाच्या भल्यासाठी अवलंबले पाहिजे.
यावेळी रिक्षिका चव्हाण,मेघराज पाटील अरबाज शेख यांनी मनोगत व्यक्त केले. सिटी प्राइड स्कूलच्या अध्यक्षा डॉक्टर दिपाली सवाई यांनी मार्गदर्शन करताना विध्यार्थ्यांसाठी २४ तास अभ्यासिका देण्याचे जाहीर केले. सूत्रसंचालन ओंकार शिंदे आणि ऐश्वर्या पाटील यांनी केले. संस्थेचे प्राध्यापक रेणू मॅथू ,संजय मते, प्रीथा प्रसीध, स्नीग्धा शुक्ला, हर्षदा तळणीकर, अंजली पाटील आणि विद्यार्थी उपस्िथत होते.