पुणे –रशिया-युक्रेनच्या युद्धाचा फटका खाद्यतेलाच्या बसला आहे. करडई, सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफुल आणि पामतेल आदी खाद्यतेलांच्या भावांत गेल्या आठ दिवसांत प्रचंड वाढ झाली आहे. महिनाभराचा विचार केल्यास जवळपास प्रत्येक तेलाचे भाव प्रतिकिलोमागे 25 रुपयांपर्यंत वाढले आहेत.
या परिस्थितीचा सर्वाधिक फटका सोयाबीनला बसला आहे. ब्राझिल, दक्षिण अमेरिका या देशांत सोयाबीनचे उत्पादन घटल्याने सोयाबीचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच चीन, इराण या देशांकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. आता रशिया-युक्रेन युद्धामुळे आणखी बिकट परिस्थिती बनली आहे. युद्धावर लवकर तोडगा निघाला नाही, तर खाद्यतेलाला मोठ्या फटका बसणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत तेल आणखी महागणार असल्याचे तेलाचे व्यापारी कन्हैयालाल गुजराथी यांनी सांगितले. दरम्यान, यामुळे मात्र किचन बजेट पुन्हा कोलमडल्याचे चित्र दिसून येत आहे.