ओतावा : कॅनडाच्या उत्तर पश्चिम प्रदेशामध्ये सोन्याच्या खाणीमध्ये खोदकाम सुरू असताना करणाऱ्यांना एक विचित्र वस्तू मिळाली. एखाद्या सोन्याच्या चेंडू प्रमाणे ती वस्तू होती काही तज्ञांनी शोध घेतला असता ती एका प्राण्याची ममी असल्याचे लक्षात आले. 30000 वर्षांपूर्वीची ही ममी असून ती खारीसारख्या छोट्या प्राण्याची असावी असा संशोधकांचा अंदाज आहे.
या संशोधकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ही खार अरक्ट्रिक ग्राउंड या प्रजातीची आहे या प्रदेशामध्ये अशा प्रकारच्या खारी आजही आढळतात. ममी झालेल्या या खारीचे शरीर काही कारणांनी मुडपले गेल्यामुळे ते एखाद्या चेंडूसारखे दिसत होते.
पहिल्यांदा जेव्हा ही वस्तू काम करणाऱ्यांना सापडली तेव्हा त्यांना तो एखादा सोन्याचा चेंडू असावा असेच वाटले पण त्या वस्तूवर केसांसारख्या रेषा आढळल्याने संशोधकांनी अधिक संशोधन केले असता ती एका खारीची ममी असल्याचे लक्षात आले. या प्रकारच्या खारी नेहमी जमिनीखाली बिळामध्ये राहतात.
त्यामुळे कोणत्यातरी नैसर्गिक कारणामुळे त्या परिसरामध्ये अनेक प्राण्यांचा मृत्यू झाला त्यावेळी या खारीचाही मृत्यू झाला असे संशोधकांचे म्हणणे आहे. 2022 मध्ये सुद्धा या सोन्याच्या खाणीमध्ये खोदकाम करत असताना अशाच प्रकारे एक जीवाश्म मिळाला होता.