पारगाव शिंगव (वार्ताहर) – पारगाव येथील कचरा कुंडीत अंदाजे ५० वर्षीय वयाच्या एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला. ही घटना शुक्रवारी (दि.२६) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पारगाव (ता.आंबेगाव) येथे उघडकीस आली. या घटनेची माहिती गावच्या सरपंच श्वेता किरण ढोबळे यांनी पारगाव पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामपंचायतीचे कर्मचारी बाळू भागवत हे गावातील कचरा गोळा करून पारगाव गावठाण येथील कचरा कुंडीच्या आवारात शुक्रवारी (दि.२६) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी कंपाउंडच्या आतमध्ये एक व्यक्ती झोपलेल्या अवस्थेत दिसली.
तेव्हा ते त्या व्यक्तीच्या जवळ जावून त्यास उठविण्याचा प्रयत्न केला असता तो उठला नाही. म्हणून त्यांची खात्री झाली की, सदरची व्यक्ती ही मृत आहे. या घटनेची माहिती सरपंच श्वेता किरण ढोबळे यांना सांगितली. सरपंच श्वेता ढोबळे व ग्रामपंचायत सदस्य किरण ढोबळे हे घटनास्थळी जावून पाहणी केली. सरपंच श्वेता यांनी पारगाव पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली.
घटनास्थळी पारगाव पोलिसांनी पाहणी केली. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोहरे तपास करित आहेत. पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे मोबाईल नंबर 8369091663 वर नातेवाईकांनी माहिती मिळाल्यास संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.