भुवनेश्वर – ओडिशा सरकार राज्यातील प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमध्ये 20,000 कनिष्ठ शिक्षकांची भरती करणार आहे. ओडिशा सरकारच्या शालेय शिक्षण कार्यक्रम प्राधिकरणाने जारी केलेल्या सूचनेनुसार,
पात्र उमेदवार कनिष्ठ शिक्षक पदासाठी 13 सप्टेंबरपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. ते 10 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.
इतर कोणत्याही पद्धतीचा अर्ज स्वीकारला जाणार नाही आणि त्यासाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही, असे त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. उमेदवारांची निवड सरकारद्वारे घेण्यात येणाऱ्या संगणक-आधारित चाचणी मधील गुणांच्या आधारे केली जाईल.
ओडिशा सरकारने अलिकडच्या काळात पहिल्यांदाच असा शिक्षक भरतीचा मोठा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे डीएड, बीएड झालेल्या युवकांमध्ये उत्साही वातावरण तयार झाले आहे.