मुंबई – देशात काही काळापासून विमान प्रवासात महिलांचे विनयभंग होण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याचे उघडकीस येत आहे. त्यातच आज मुंबईहून गुवाहाटी प्रवासादरम्यान महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुवाहाटी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
यासंदर्भात इंडिगो एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-गुवाहाटीच्या इंडिगो विमान 6ई-5319 वर प्रवास करणाऱ्या महिलेने विनयभंग झाल्याची तक्रार केली होती. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केले. या महिलेने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या प्रकरणाच्या तपासात एअरलाइन्स सहकार्य करण्यास तयार आहे.
विमानाची लाइट मंद झाली होती आणि मी झोपेत असताना. माझ्या सीटचे आर्मरेस्ट उठले होते आणि एक व्यक्ती माझ्या दिशेने झुकला होता. मला हे विचित्र वाटले. कारण माझ्या लक्षात आहे की, मी आर्मरेस्ट खाली करून झोपले होते, अशी माहिती महिलेने एक इंग्रजी वृत्तपत्राला माहिती दिली.