माऊंट मोनगानुई : भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तीन एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना आज होत आहे. तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका गमावल्यानंतर व्हाईटवॉश टाळण्यासाठी भारतीय संघ अखेरच्या एकदिवसीय सामन्यात खेळणार आहे. तर, न्यूझीलंड भारताला व्हाईटवाॅश देण्याच्या तयारीनेच मैदानात उतरेल.
माऊंट मोनगानुई येथील मैदानावर थोड्याच वेळात सामन्यास सुरूवात होणार असून तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा न्यूझीलंडच्या बाजूने लागला आहे. कर्णधार केन विल्यमसनने क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
New Zealand have won the toss and they will bowl first in the 3rd and final ODI.#NZvIND pic.twitter.com/A21ZjEkzKt
— BCCI (@BCCI) February 11, 2020
दरम्यान, एकदिवसीय मालिकेआधी भारताने न्यूझीलंडला टी-२० मालिकेत ५-० असे पराभूत केले होते. त्यामुळ् अखेरचा एकदिवसीय सामना जिंकून टी-२० मालिकेतल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी न्यूझीलंडच्या संघाकडे आज असणार आहे.