माउंट माँगेन्यूई : पहिल्या डावातील भक्कम आघाडीच्या जोरावर न्यूझीलंडने इंग्लंडविरूध्दच्या मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात एक डाव व ६५ धावांनी विजय मिळविला. या विजयासह न्यूझीलंडने दोन कसोटींच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात २०५ धावा करणारा बीजे वाॅलिंग हा सामन्याचा मानकरी ठरला.
New Zealand win by an innings and 65 runs!
Neil Wagner wraps things up in style with a five-wicket haul in the second innings. He picks up two in two, sending back Jofra Archer and Stuart Broad. England are bowled out for 197.#NZvENG SCORECARD 👇https://t.co/IdOtHFVZap pic.twitter.com/HRB3IQsjHG
— ICC (@ICC) November 25, 2019
कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात फलंदाजी करताना सर्वबाद ३५३ धावा केल्या होत्या. त्यानंतर बीजे वाॅटलिंगचे व्दिशतक व मिचेल सँटनरच्या शतकामुळे न्यूझीलंडने रविवारी ९ बाद ६१५ धावांवर पहिला डाव घोषित करून २६२ धावांची आघाडी घेतली.
त्यानंतर नील वैगनर आणि मिचेल सँटनर यांच्या अचूक व प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने इंग्लंडचा दुसरा डाव १९७ धावांवर संपुष्टात आणला. इंग्लंडकडून फलंदाजीत दुस-या डावात जो डेनलीने ३५, राॅरी बर्न्सने ३१, जोर्फा आर्चरने ३०, सॅम करनने २९ आणि बेन स्टोक्सने २८ धावा केल्या. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत दुस-या डावात नील वैगनरने सर्वाधिक ५ गडी बाद केले तर मिचेल सॅटनरने ३ गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली. टिम साउदी आणि काॅलिन डी ग्रैंडहोमने प्रत्येकी १ गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड – पहिला डाव ३५३ आणि दुसरा डाव ९६.२ षटकांत सर्वबाद १९७( जो डेनली ३५, राॅरी बर्न्स ३१, जोफ्रा आर्चर ३०, नील वैगनर ५-४४, सँटनर ३-५३, काॅलिन डी ग्रैंडहोम १-१५, टिम साउदी १-६०) पराभूत वि. न्यूझीलंड – पहिला डाव २०१ षटकांत ९ बाद ६१५ घोषित.)