मुंबई – अजय देवगण आणि काजोलची लाडकी मुलगी न्यासा नेहमीच चर्चेत असते. न्यासाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर कायमच व्हायरल होत असतात. न्यासा देवगन तिच्या बेस्ट फ्रेंड ओरीसोबत अनेक पार्टी आणि डिनरमध्ये दिसून येते. यावेळीही दोघेही एकत्र स्पॉट झाले. मात्र, यावेळी कारमधून उतरताना असे काही घडले की न्यासा चांगलीच चर्चेत आली. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यावर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून न्यासा सतत प्रसिद्धी झोतात येत असते. अनेकांना लवकरच ती एखाद्या सिनेमात देखील दिसेल असं वाटत असलं तरी ती अद्याप आपले शिक्षण पूर्ण करणार असल्याचे तिची आई आणि अभिनेत्री काजोलने स्पष्ट केले आहे. असं असलं तरी स्टार कीड असल्यामुळे न्यासा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येते. नुकताच तिचा एक डिनरला जातानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये न्यासा ओरीसोबत डिनरसाठी आल्याचे पाहायला मिळत आहे. दोघेही एकाच गाडीतून खाली उतरताना दिसत आहेत. न्यासा तिच्या कारमधून खाली उतरताच, तिचा सुरक्षा रक्षक अचानक गेट उघडण्यासाठी येतो आणि न्यासा त्याच्याशी धडकता धडकता वाचते. यानंतर न्यासा हसत आत जाते. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर यूजर्सने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
यावेळी न्यासाने ना कोणते गैरवर्तन केले ना कोणता बोल्ड ड्रेस घातला. ना तिने एखादी वेगळी कृती केली. परंतु तिचा हा साधा व्हिडीओ चर्चेत आला तो म्हणजे तिच्यासोबत असलेल्या ‘ओरी’ या मित्रामुळे. चाहत्यांना या व्हिडिओवर ओरीबाबत खूप सारे सवाल उपस्थित केले आहेत. यामुळेच न्यासा देखील ट्रोल झाल्याचे समजते.
View this post on Instagram
व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, ‘ती नेहमी नशेत असते’. तर आणखी एकाने लिहिले, ‘अगदी आईवर गेली आहे’. आणखी एक युजर लिहितो, ‘हा ओरी केवळ मुलींसोबतच दिसतो’. दुसरा यूजर लिहितो, ‘किस्मत हो तो ओरी भाई जैसी’.