नवी दिल्ली : सोशल मीडियावर रोज नवनवे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. झारखंडमध्ये देखील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे त्याचे पडसाद थेट इथल्या राजकीय वर्तुळात उमटले आहेत. झारखंडचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता यांचा एक अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचा परिणाम मंत्रिमंडळावर झाला असल्याचे दिसून येत आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये बन्ना गुप्ता एका तरुणीशी व्हिडीओ कॉलवर बोलत आहेत. तर ती तरुणी न्युड आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता विरोधी पक्षांनी बन्ना गुप्ता यांच्यावर टीका सुरू केली आहे. तर भाजपाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Jharkhand: BJP seeks minister’s resignation over purported video chat with woman; he calls it fake
Read @ANI Story | https://t.co/XZxhXBKplm#Jharkhand #BJP #videochat pic.twitter.com/vkhmCvxijz
— ANI Digital (@ani_digital) April 23, 2023
तर दुसरीकडे मंत्री बन्ना गुप्ता यांनी या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.त्यांनी ‘हा व्हिडीओ फेक आणि एडिटेड असल्याचे म्हटले आहे. गुप्ता म्हणाले की, माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी माझ्या राजकीय विरोधकांनी हा व्हिडीओ व्हायरल केला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, हा व्हिडीओ एडिट केला आहे. मी एफआयआर दाखल केला आहे, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी रविवारी संध्याकाळी मंत्री बन्ना गुप्ता यांचा अश्लील व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. तसेच कॅप्शनमध्ये लिहिलं की, महिलांचा आदर कसा करायचा हे काँग्रेस नेत्यांना कळत नाही. हेच काँग्रेसचं चारित्र्य आहे.