अभिनेता अजय देवगणच्या ‘शैतान’ चित्रपट गेल्या कित्यके दिवसापासून आहे. अशात आज अजयने या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमांतून शेअर केले आहे. यासोबत अजयने या चित्रपटाची रिलीज डेट चाहत्यांसोबत शेअर केली आहे, हा चित्रपट ८ मार्च २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात आर. माधवन सुद्धा ज्योतिका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘शैतान’ सुपरनैचुरल थ्रिलर चित्रपट आहे. वश या गुजराती चित्रपटाचा ‘शैतान’ हा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे.
2023 चा गुजराती भाषेतील सुपर नॅचरल हॉरर थ्रिलर ‘वश’, मूळतः कृष्णदेव याज्ञिक दिग्दर्शित, त्याच्या मनोरंजक कथेने सर्वांची मने जिंकली. हितेन कुमार, हितू कनोडिया, जानकी बोडीवाला आणि नीलम पांचाळ यांनी या चित्रपटातील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाची प्रशंसा केली. ‘वश’ चित्रपटाची कथा अथर्व या कौटुंबिक पुरुषाभोवती फिरते, जो प्रताप नावाच्या अनोळखी व्यक्तीच्या काळ्या जादूमध्ये अडकतो.
सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करतांना अजय देवगणने लिहिले,’तुमच्या भेटीला ‘शैतान’ येतोय. ८ मार्च २०२४ ला चित्रपट रिलीज होणार आहे, या चित्रपटात अजय देवगन आणि आर. माधवन पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. अजय देवगनच्या वर्क फ्रंट बाबत बोलायचे झाल्यास, मागील वर्षी भोला चित्रपटात तो दिसला होता. त्याच्याकडे ‘शैतान’ व्यतिरिक्त अजय ‘सिंघम अगेन’, ‘रेड 2’ आणि ‘मैदान’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.