आता गुन्हे सिद्ध करण्यावर भर

प्रयत्न पोलिसांचे ः 432 पैकी 353 प्रकरणांमध्ये आरोपी ठरले दोषी

पिंपरी – पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाच्या हद्दीत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये जास्तीत जास्त अपराध्यांना शिक्षा मिळावी, यासाठी पोलिसांनी न्यायालयात आरोपींवरील आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्‍यक त्या सर्व बाबी करण्यावर भर दिला आहे. पोलीस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी हद्दीतील सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना या बाबत सूचना दिल्या असून, त्यानुसार काम करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असल्याचे सध्या दिसून येत आहे. एका महिन्यात दाखल झालेल्या 432 गुन्ह्यांपैकी 353 प्रकरणांमध्ये पोलिसांना दाखल केलेल्या दोषारोपपत्रात आरोपींना दोषी ठरवण्यात आले.

आयुक्‍त पद्मनाभन यांनी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत गुन्हे दाखल करुन घेऊन गंभीरपणे तपास करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार संबंधित आरोपींवर दोष सिद्ध करण्यासाठी तपासाला वेग देण्यात आला. आयुक्‍तालयाच्या हद्दीत एका महिन्यात दाखल झालेल्या 432 गुन्ह्यांपैकी 353 प्रकरणांमध्ये दाखल केलेल्या दोषारोपपत्रात पोलिसांनी आरोपी दोषी असल्याचे आपल्या तपासाद्वारे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर तडीपारी व मोका अंतर्गत कारवाईलाही वेग देण्यात आला आहे. दोन्ही परिमंडळ या दिशेने कार्यवाही करत आहे.

खापर पोलिसांवरच गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींची सुटका होऊन निकाल सरकारच्या विरुद्ध जात असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पिंपरी- चिंचवड आयुक्‍तालयातील प्रकरणांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये आरोप सिद्ध झालेल्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. बऱ्याचदा तक्रारदार आपली अशी तक्रार नसल्याचे सांगून आपले विधान बदलतो.

चुकीची फिर्याद घेतल्याचे सांगून याचे खापरही पोलिसांवरच फोडले जाते. याचा परिणाम निकालावर होत असल्याचा फायदा आरोपीला होतो. पिंपरी-चिंचवडमध्ये दोषसिध्दीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. हे प्रमाण असेच राहिल्यास गुन्हेगारांवर देखील पोलिसांचा चांगला वचक निर्माण होणार आहे. तसेच गुन्हा केल्यास शिक्षा मिळणारच ही जाणीवही झाल्यास गुन्ह्यांनाही चाप बसेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.