राफेल विमानांमुळे हवाई हल्ला आणखी प्रभावी झाला असता – बी. एस. धानोआ

काश्मीरमधल्या पुलवामा मध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमधल्या बालाकोटच्या दहशतवादी तळावर हल्ला केला होता. या हवाई हल्ल्यात मिराज विमानं वापरण्यात आली होती. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात राफेल विमानं वापरली असती तर हा हल्ला आणखी प्रभावी झाला असता. असे वक्तव्य हवाईदल प्रमुख बी. एस. धानोआ  यांनी केले आहे. तसेच भारताच्या हवाई दलात मिग – 2, मिग बायसन आणि मिराज – 2000 ही विमानं आहेत. ही विमानं भारताच्या हवाई दलाची शान आहेत. यामध्ये राफेल विमानांचीही भर पडायला हवी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.