नगर – करोनाच्या पार्श्वभूमीवर नोबल मेडिकल फाउंडेशनच्या वतीने 30 लाख रुपयांच्या निधीतून जिल्हा रुग्णालयात गोरगरिबांच्या सेवेसाठी 20 बेडचा अत्याधुनिक अतिदक्षता विभाग कार्यन्वित केला आहे. या विभागाचे लोकार्पण रविवारी (दि.12) रोजी सकाळी 11 वाजता आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. बापूसाहेब कांडेकर यांनी दिली.
शहरासह जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून करोनाबाधितांवर जलद गतीने उपचार होऊन रुग्ण लवकरात लवकर घरी परतावा, या उद्देशाने अतिदक्षता विभाग वैद्यकीय सुविधांनी सज्ज करण्यात आला आहे. त्यासाठी फाउंडेशनचे विश्वस्त फाउंडेशनचे विश्वत डॉ. संगीता कांडेकर, डॉ. पांडुरंग डौले, डॉ. नानासाहेब अकोलकर, डॉ. विजय पाटील, डॉ. सुंडर गोरे, डॉ. सुनील बंदिष्टी, यांचे योगदान आहे.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, डॉ. सुनील पोखर्णा, डॉ. बापूसाहेब गाढे, यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण झाले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, व आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनचे काम सुरु आहे. या उद्घाटन प्रसंगी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे यावेळी उपस्थित राहणार आहे.