उत्तर प्रदेश पोलिसांची न्यायालयात कबुली, उद्या जामीन मिळण्याची शक्यता
नवी दिल्ली : सुधारीत नागरीकत्व कायद्याच्या (का) विरोधातील निदर्शनातील सहभागाबद्दल अटक केल्या सामाजिक कार्यकर्त्या सदफ जाफर यांच्या चिरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी न्यायलायात कबूल केले. अलाहाबाद उच्च न्यायलयाने योगी आदित्यनाथ सरकारला जाफर यांच्या अटकेबद्दल नोटीस बजावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांना याची उपरती झाली.
जाफर यांचा हिंसाचारात सहभाग असल्याचा कोणता पुरावा तुमच्याकडे आहे, असे न्यायलयाने पोलिसांना थेट विचारले. त्यावेळी तपास अधिकाऱ्यांनी हे उत्तर दिले. या जाफर यांच्या जामीन अर्जावर शनिवारीही सुनावणी होणार आहे.
माजी अभिनेत्री असणाऱ्या आणि दोन मुलांची एकल माता असणाऱ्या जाफर यांच्यावर वेगवेगळे 18 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लखनऊमध्ये का कायद्याविरोधात सुरू झालेल्या निदर्शना दरम्यान पोलिसांवर दगडफरक करणाऱ्यांना पोलिस अटक करत असतानाचे फेसबुक लाईव्ह करत असताना त्यांना 19 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली.
निदर्शने करण्यावर प्रतिबंध घालणारे कोणतेही आदेश जिल्हा प्रशासनानर दिले नव्हते. त्यामुळे जाफर यांनी कोणत्याही नियमाचे उल्लंघन केले नाही. त्यावर जाफर यांच्या विरोधात कोणते पुरावे आहेत, ते सादर का असे न्यायलयाने पोलिसांना सांगितले. त्यावेळी त्यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचे पोलिसांनी सांगितले, असे जाफर यांच्या वकील हरज्योतसिंग यांनी यांनी सांगितले.
जाफर यांना उद्या जामीन मिळण्याची शक्यता आहे, असे सिंग म्हणाल्या. जाफर यांचे कुटुंबीय आणि कॉंग्रेसने पोलिसांनी जाफर यांचा कोठडॅत छळ केला आहे. त्यांना वैद्यकीय सुविधा दिली नाहीअशी तख्रार केली आहे.
दरम्यान जाफर यांची सुटका करण्याच्या चेंज डॉट ओआरजीच्या मागणीला 46 हजार जणांनी पाठींबा दर्शवला.
चेंज डॉट ओराजीच्या आवाहनाचा आशय असा : सदाफ या शिक्षक आहेत. एकल माता अहेत. सर्व गुण संपन्न आणि खंबीर अशी स्त्री आहे. या क्षणाला ती कारागृहात गजाआड आहे. त्यांना जामीन नाकारण्यात आला आहे. त्यांचा दोष एकच – या देशाचा एक नागरिक म्हणून त्यांनी आंदोलनात भाग घेतला. त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी बेदम मारहाण केली. त्यात त्यांना अनेक जखमा झाल्या अहेत. निदर्शनांचे फेसबुक लाईव्ह करताना त्यांना अटक करण्यात आली आहे.
चित्रपट निर्मात्या मिरा नायर यांनी ट्विटरवर आपला राग व्यक्त केला आहे. त्या म्हणतात, सदाफ कारागृहात 12 दिवस सडत आहे. त्यांचा आतोनात छळ करण्यात येत आहे. गोठवून टाकणाऱ्या थंडीत त्यांना कारागृहाच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. या वर्षाच्या अखेरीस आपण तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचीही अखेर करूया.
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत नायर यांनी जाफर यांच्या यांच्यावरील संकटावर भाष्य केले. एक असामान्य शिक्षक, एकल माता आणि कार्यकर्त्या असणाऱ्या सदाफ जाफर यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्या 19 डिसेंबरपासून कारागृहात आहेत. त्यांना औषधे घेऊ दिली जात नाहीत. त्यांना अंतर्गत रक्तस्त्राव होत आहे. कारागृहात गोठवून टाकणारी थंडी आहे. त्यांना गादीही दिली जात नाही. केवळ एक ब्लॅंकेट देण्यात येते. तिची मुले लहान आणि एकटी अहोत. तिच्या परतण्याची कोणतीही आशा नाही. त्यांनी कारागृहात डांबले आणि जणू त्याची चावी फेकून दिली आहे, ासे त्या म्हणाल्या.
प्रख्यात दिग्दर्शक महेश भट्ट यांनीही याबाबत एक ट्विट केले आहे. त्याला 500 जणांनी री ट्विट केले आहे.