नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) सध्या प्रचंड टीकेचा सामना करत आहे. माजी कर्णधार राहुल द्रविड हा संचालक असला तरीही अकादमीच्या कार्यपध्दतीवर खेळाडू अत्यंत नाराज आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी राहुल द्रविडशी सविस्तर चर्चा केली आहे.
पाठीच्या दुखापतीतून पूर्ण तंदुरस्त झालेला वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहची तंदुरस्ती चाचणी घेण्यास नकार दिल्यामुळे अकादमीच्या या भूमिकेबाबत अनेक स्तरावर टीका झाली.
गांगुलीशी काय चर्चा झाली याबाबत माध्यमांशी बोलण्यास दोघांनाही नकार दिला दिला असला तरीही गांगुलीने अकादमीच्या कार्यपध्दतीवर द्रविडने अंकुश ठेवावा व कामकाज आणखी पारदर्शी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केल्याचे समजते.