Nitin Gadkari Legal Notice | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि जयराम रमेश यांना कायदेशीर नोटीस बजावलीय. काँग्रेसने आपली प्रतिमा मालिन करण्यासाठी आणि पक्षातील त्यांची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी एक व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर केलाय, असा आरोप गडकरींकडून करण्यात आला आहे. त्यासंबंधीच ही नोटीस बजावण्यात आलीय. अद्याप या नोटिशीला काँग्रेसने उत्तर दिलं नाही.
काँग्रेसने शेअर केलेला व्हिडिओ अर्धा Nitin Gadkari Legal Notice |
काही दिवसांपूर्वी काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरीयांनी “शेतकरी आणि मजूर संतप्त आहेत, गावांमध्ये रस्ते नाहीत, चांगली रुग्णालये नाहीत. ” हा व्हिडिओ काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि जयराम रमेश यांनी भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शेअर केलाय. पण आता गडकरींनी दावा केला आहे की, काँग्रेसने शेअर केलेला व्हिडिओ अर्धा आहे आणि मुद्दाम एडिट करण्यात आला आहे.
Modi Govt’s top minister Nitin Gadkari saying that farmers, labourers, tribals are living in bad conditions. Govt failed in providing good hospital, eduction to rural India, farmers are not getting MSP as they required.
Thanks for accepting the truth.
Modi Govt is a failed Govt. pic.twitter.com/gvoBkLtIHF— Ravi Boseraju (@raviboseraju) March 2, 2024
केंद्रीय मंत्र्याच्या म्हणण्यानुसार, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी असेही म्हटले होते की, या सरकारच्या कार्यकाळात या सर्व विभागांमध्ये उत्कृष्ट काम झाले. पण काँग्रेसने जाणीवपूर्वक अर्धवट व्हिडीओ दाखवून गडकरींची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या कारणास्तव केंद्रीय मंत्र्यांच्या वतीने मल्लिकार्जुन खरगे आणि जयराम रमेश या दोघांना कायदेशीर नोटीस देण्यात आलीय.
२४ तासांच्या आत तो व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवावा लागेल Nitin Gadkari Legal Notice |
त्या कायदेशीर सूचनेनुसार खरगे आणि जयराम रमेश या दोघांना २४ तासांच्या आत तो व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवावा लागेल आणि लेखी माफीही मागावी लागेल. काँग्रेस या कायदेशीर नोटीसला काय उत्तर देते आणि त्यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे गरजेचे आहे. निवडणुकीचे वातावरण असल्याने येत्या काही दिवसांत अशा कायदेशीर नोटिसा आणि आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळतील. एखाद्या नेत्याला अशाप्रकारे नोटीस बजावण्याची ही पहिलीच वेळ नाही.